कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत म्हणजे आणखी एका महिन्यासाठी म्हणजेच 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र या कालावधीत अनेक गोष्टी शिथिल होणार आहेत. केंद्र सरकारने एक दिवस आधीच लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याबाबत पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. अनलॉक अशा पद्धतीने अमलात येईल:- 1. मंदिर, मशिदी आणि सर्व प्रार्थनास्थळं 8 जूनपासून उघडणार. 2. हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल 8 जूनपासून उघडणार. 3. वरील गोष्टींसाठी लवकरच आरोग्य विभाग नियमावली जाहीर करणार. 4. शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांबद्दलचा निर्णय जुलै 2020 मध्ये घेणार. 5. राज्य सरकार शैक्षणिक संस्था आणि पालकांसह चर्चा करून केंद्राला कळवणार, त्यानंतर निर्णय. 6. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान तोंडावर मास्क किंवा कापड बांधणं बंधनकारक. 7. लॉकडाऊन कंटेनमेंट झोन्समध्ये 30 जूनपर्यंत सुरू राहील. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असेल. लोकांच्या आत-बाहेर येण्यावर बंदी असेल. 8. कंटनेमेंट झोन्सच्या बाहेर बफर झोन्स आखण्याचा निर्णय र...