बाजारात जाताना आणि बाजारातून घरी येताना / आल्यावर :-
- आपण घराबाहेर जातो तेव्हा नेहमीच तिहेरी थर / एन- ९५ मास्क लावावे किंवा जाड कापडाने चेहरा झाकावा
- घरातून बाहेर बाजारात जाण्यासाठी वेगळी एक चप्पल ठेवावी. तीच चप्पल फक्त बाहेर जाण्यासाठीच वापरावी.
- बाजारातील कोणत्याही व्यक्ती किंवा दुकानदार पासूनचे अंतर नेहमी कमीतकमी ६ फूट ठेवा .
- आपण घराबाहेर गेल्या नंतर कोणत्याही अनावश्यक गोष्टींना हात लावू नये.
- आपण घराबाहेर असताना आपण आपल्या तोंडाला हात लावू नये.
- कुठे हि जाताना आपल्या सोबत हॅन्ड सॅनिटायझर ( ७० % अल्कोहोल ) सोबत ठेवा. कुठे संशयास्पद स्पर्श झाल्यास लगेच हॅन्ड सॅनिटायझर ने स्वच्छ करून घ्या.
- बाजारात जाताना सोबत जाड प्लास्टिक पिशवी किंवा बादली घेऊन जा. म्हणजे वस्तू आणल्यावर त्या धुवायला हि चांगले आणि पिशवी किंवा बादली पुन्हा वापरासाठी ठेवता येईल. जेव्हा खूप महत्वाचे असेल तेव्हाच बाजारात जा. उगाच एक वस्तू आणायला सारखे सारखे जाऊ नका. सामानाची लिस्ट तयार करा , म्हणजेच काही राहिला तर परत जाणे टाळू शकाल.
- एका आठवड्या साठी लागणारे सामान एकदाच घेऊन या, बाजारात जाताना शक्यतो एकाने जावे.
- फक्त भाजी किंवा दूध आणायला बाजारात जात असाल तर तुमच्या मजल्यावरील शेजारींना विचार आणि सगळ्यांचं सामान एकानेच घेऊन या, या मुळे बाजारातील गर्दी कमी होईल . एक दिवस आड करून दुसऱ्या शेजारी ला पाठवा.
बाजार मध्ये व्यवहार करताना किंवा पैसे देताना किंवा घेताना:-
- बाजारातील व्यवहार करण्यासाठी डिजिटल पेमेंट सिस्टम वापरावी ( Google Pay , Phone Pay, BHIM Apps, or net banking services )
- जर तुही तुमच्या कडील कॅश वापरात असाल तर कोणताही दुकानदार कडून सुट्टे पैसे घेऊ नका त्या बदल्यात इतर गरजेची वस्तू घ्या.
- जर कधी जास्त पैसे असतील आणि त्या बदल्यात दुकान दारा कडून तेवढा सामान घ्यायचे नसल्यास आपण ते सुट्टे पैसे आपल्या हातात तसेच ठेवावे आणि घरी आल्यावर त्या नोटांना इस्त्री ने प्रेस करावे. व त्या नंतर त्यानां एक पाकीट मद्धे ठेवावे दुसऱ्या वेळी बाजारात जाताना ते पाकीट घेऊन जावे.
सार्वजानिक लिफ्ट किंवा जिना / पायऱ्या
वापर करताना:-
- सध्या च्या परिस्थिती मध्ये पायरी ने खाली जावे किंवा घरी येताना पण पायरीचा वापर करावा.
- आपल्या हातानी जिना किंवा जिनांच्या पायऱ्यांना स्पर्श करू नका.
- जर लिफ्ट वापरायची असेल तर खिशा मध्ये कागदी तुकडे ठेवा , म्हणजे त्या मुळे लिफ्ट चे बटन दाबताना बोट आणि बटन च्या मध्ये पकडून दाबावे त्यामुळे तुमचा लिफ्ट च्या बटन ला स्पर्श होणार नाही.
- वापर झालेला कागद लगेच कचरा पेटी मध्ये टाका.
- लिफ्ट वापरताना सुरक्षित अंतर ठेवा , कोणालाही स्पर्श करू नका किंवा विनाकारण कुठे हि स्पर्श करू नका.
बाजारातून आल्यावर घरात प्रवेश करताना:-
- दाराला हात लावू नका, बेल वाजवू नका , जोरात हाक मारा किंवा तुमच्या मोबाईल ने कॉल करा.
- दरवाज्या जवळ बादली किंवा टेबल ठेवा त्यात तुम्ही आणलेले सामान ठेवा , आणि त्या नंतर त्याचे निर्जंतुकरण करून घ्या.
- तुम्ही लगेच बाथरूम मध्ये जा कमीतकमी २० ते २५ सेकंद तुमचे हात , तोंड , पाय साबणाने (अल्कोहोल युक्त ) धुवा.
- आपले अंगावरील सगळे कपडे काढून एक (डिटर्जन युक्त पाणी ) बादलीमध्ये धुवायला टाकून ते धुवून घ्या. आणि तुम्ही साबणाने अंघोळ करून घ्या.
- डिटर्जन युक्त पाण्याने आपली चप्पल स्वच्छ धुवून घ्या.
बाहेरील व्यक्ती ची आपल्या घरी भेट
:-
- जर प्लम्बर , इलेकट्रीशन किंवा अन्य कोणी जर कोणी घरात येत असेल तर त्याला ताप , सर्दी , खोकला येत आहे काय विचारा. त्याला मास्क लावून घरात येण्यास सांगावे.
- हॅन्ड सानिटीझर लावून त्याचे हात निर्जंतुक करून घेण्यास सांगावे.
- ज्या कामासाठी तो आला आहे तेच काम करायला सांगा दुसरी कडे कुठे हि स्पर्श करायला देऊ नका.
- काम झाल्या वर त्याने वापरलेली साधने , उपकरणे आणि जागा साबण्याच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
घराचे निर्जंतुकरण कसे कराल :-
- २ % डिटर्जन सोलुशन / १ % सोडियम हायपोक्लोराइट सोलुशन दररोज सकाळी फारशी धुवून घ्या.
- दार दिवशी सकाळी ७०% अल्कोहोल सॅनिटायझर ने घराचा मेन दरवाजा त्याचे काडी , हॅण्डल आणि लॉक पुसून घ्या .
स्वयंपाकातील वस्तूचे निर्जंतुकरण
:-
- स्वयंपाकातील सामानाला साबणाने धुवून घ्यावे .
- गॅस च्या जवळ सॅनिटायझर वापर करू नये . तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करताना सॅनिटायझरचा वापर टाळावा.
भाजीपाला चे निर्जंतुकरण कसे कराल :-
- भाजीपाला , दूध पिशवी , अंडी आणि फळे एका बादलीमध्ये टाका त्यात २ % साबण किंवा डिटर्जन पावडर टाका , आणि त्यानां हाताने नीट चोळून घ्या.
- भाजीपाला किंवा फळे स्वच्छ नळाच्या पाण्याने धुवून घ्या.त्यांना तसेच सावली मध्ये वाळवून घ्या .
- अधिक भाजी किंवा फळे फ्रिज मध्ये ठेवा , जेव्हा वापरायची असेल तर ती बाहेर काढून परत धुवून घ्या.
आपल्या रोग प्रतिकार शक्ती ला प्राधांन्य
द्या:-
- दररोज किमान योगासने , प्राणायाम आणि ध्यान साधना करा.
- दिवसातून एक किंवा दोनदा तुळस , दालचिनी, काळीमिरी, सुंठ / आले आणि मनुका पासून बनवलेले हर्बल युक्त चहा प्या. जर तुम्हाला गुल हवा असेल तर थोडा टाकू शकता.
डॉ. प्रशांत लक्ष्मण पिंगळे यांच्या लेखातून
Comments
Post a Comment